महाराष्ट्रराष्ट्रीय
Trending

देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची कथित धमकी देणाऱ्या व्हिडिओ कॉलने खळबळ ! मुंबईतील एका व्यक्तीला आला व्हिडिओ कॉल !!

मुंबई, 23 सप्टेंबर – मुंबईच्या उपनगरातील सांताक्रूझमध्ये एका व्यक्तीला देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची कथित धमकी देणारा व्हिडिओ कॉल्स मिळाल्यावर त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली.

अधिकारी म्हणाले की, रफत हुसैन (55) यांना मंगळवारी एका अज्ञात व्यक्तीकडून कथितरित्या व्हिडिओ कॉल आला, ज्यामध्ये कॉलरने दावा केला की तो देशात बॉम्बस्फोट घडवून आणेल.

हुसैन यांनी तात्काळ सांताक्रूझ पोलिस ठाण्याशी संपर्क साधला आणि अधिकाऱ्यांना धमकीच्या व्हिडिओ कॉलची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तक्रार नोंदवली.

भारतीय दंड संहितेच्या कलम ५०५ आणि ५०६(२) (गुन्हेगारी हेतू) अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलीस त्या व्यक्तीला धमकीचा व्हिडीओ कॉल ज्या मोबाईल नंबरवरून आला होता त्याची पडताळणी करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!