राष्ट्रीय
Trending

35 वर्षांपूर्वी एका छोट्याशा खोलीत साखळदंडाने बांधून ठेवलेल्या महिलेची भाजप आमदराने केली सुटका !

फिरोजाबाद, 9 ऑक्टोबर – उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील टुंडला पोलीस स्टेशन हद्दीतील मोहम्मदाबाद गावात 35 वर्षांपासून स्वत:च्या घरात कैद असलेल्या एका मानसीक रुग्ण महिलेची भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) आमदार अंजुला माहूर यांच्या पुढाकाराने हातरसमधून सुटका करण्यात आली.

माहूरने रविवारी पत्रकारांना सांगितले की, तुंडला पोलिस स्टेशन हद्दीतील मोहम्मदाबाद गावातील रहिवासी सपना (५३) हिला तिच्या वडिलांनी सुमारे ३५ वर्षांपूर्वी एका छोट्याशा खोलीत साखळदंडाने बांधून ठेवले होते, तिथे तिला जेवण आणि पाणी पुरवण्यात येत होते.

माहूर यांनी सांगितले की, या महिलेच्या दयनीय स्थितीबद्दल त्यांना महिनाभरापूर्वी मातृ सेवा भारती संस्थेच्या निर्मला सिंह यांच्याकडून समजले.

आमदारांच्या म्हणण्यानुसार, यानंतर त्यांनी महिलेच्या भावांशी बोलून त्यांच्या बहिणीवर उपचार करण्यासाठी त्यांचे मन वळवले.

माहूर यांनी सांगितले की, भावांनी सहमती दिल्यानंतर महिलेला सोडण्यात आले आणि आग्रा येथील मानसिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.

मात्र, याप्रकरणी पोलिसांत नोंद झाली नाही.

Back to top button
error: Content is protected !!