राष्ट्रीय
Trending

कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही, मंत्र्यानं भरला पाचशे रुपयांचा दंड !

सुलतानपूर (यूपी), 17 सप्टेंबर – उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री आणि तिलोई विधानसभा मतदारसंघाचे पाचव्यांदा आमदार असलेले मयंकेश्वर शरण सिंह सुलतानपूर जिल्ह्यातील स्थानिक न्यायालयात हजर झाले आणि त्यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल पाचशे रुपयांचा दंड भरला. त्यानंतर त्याच्यावरील कारवाई संपुष्टात आली.

मयंकेश्वर शरण सिंह यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुलतानपूर न्यायालयात हजर राहून दंडाची रक्कम जमा करून खटला संपवण्यासाठी अर्ज दाखल केला.

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी (III) सायमा सिद्दीकी जरार आलम यांच्या न्यायालयाने अर्ज स्वीकारताना राज्यमंत्र्यांना 500 रुपये दंड भरण्याची परवानगी देऊन खटल्याची कार्यवाही संपवण्याचे आदेश दिले.

राज्यमंत्र्यांचे अधिवक्ता रविवंश सिंह यांनी शनिवारी सांगितले की, 2017 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान, अमेठी जिल्ह्यातील गौरीगंज कोतवाली भागात, पोलिसांनी भाजपचे तत्कालीन उमेदवार मयंकेश्वर शरण सिंह आणि त्यांच्या 150 अज्ञात समर्थकांविरुद्ध आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल एफआयआर नोंदवला होता.

तपासादरम्यान अज्ञात समर्थकांचा शोध न लागल्याने पोलिसांनी केवळ मयंकेश्वर शरण सिंह यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.

Back to top button
error: Content is protected !!