राष्ट्रीय
Trending

मुंडण सोहळ्यासाठी जाणाऱ्या ट्रॅक्टरवर काळाचा घाला, तलावात टलटून 10 ठार, 37 जखमी !

लखनौ, 26 सप्टेंबर – राजधानी लखनऊच्या इटौंजा भागात सोमवारी मुंडण समारंभासाठी जाणाऱ्या लोकांची ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात उलटल्याने किमान 10 जण ठार तर 37 जण जखमी झाले.

जिल्हा दंडाधिकारी सूर्यपाल गंगवार यांनी सांगितले की, सीतापूर येथील काही लोक मुंडण सोहळ्यासाठी उनाई देवी मंदिरात जात होते. त्यांनी सांगितले की, वाटेत इटौंजा भागातील गद्दीनपुरवाजवळ एका तलावात ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी झाली, त्यामुळे त्याखाली असलेले लोक गाडले गेले. आवाज ऐकून शेजारी उपस्थित ग्रामस्थांनी ट्रॅक्टर-ट्रॉलीखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढले. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. मृतांमध्ये आठ महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर ट्रॉलीवर 47 जण होते.

गंगवार म्हणाले की, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.

या अपघातात 37 जण जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यापैकी 36 जणांवर इटौंजा येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत तर अन्य जखमींना लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!