राष्ट्रीय
Trending

दलित व्यक्तीला विजेच्या खांबाला बांधून बेदम मारहाण, अर्ध्या मिशा कापून गावभर फिरवले ! भाजप नेत्यासह तिघांना अटक !!

Story Highlights
  • व्हिडीओमध्ये दलित व्यक्तीच्या अर्ध्या मिशा कापल्या गेल्याचे दिसत आहे, त्याला मारहाण करण्यात आली आणि त्याला गावभर फिरवण्यात आले.

बहराइच (उत्तर प्रदेश), 24 ऑक्टोबर – उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात टॉयलेट सीटची चोरी केल्याबद्दल एका दलित व्यक्तीला विजेच्या खांबाला बांधून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) स्थानिक नेत्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोक कुमार यांनी रविवारी सांगितले की, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये काही लोकांनी एका 30 वर्षीय दलित व्यक्तीला खांबाला बांधले.

कुमार म्हणाले की, व्हिडीओमध्ये दलित व्यक्तीच्या अर्ध्या मिशा कापल्या गेल्याचे दिसत आहे, त्याला मारहाण करण्यात आली आणि त्याला गावभर फिरवण्यात आले.

कुमार म्हणाले की, या प्रकरणाच्या तपासादरम्यान ही घटना बुधवारी हरदिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संपूर्ण हिंद सिंग गावात घडल्याचे आढळून आले. त्यांच्या म्हणण्यानुसार, पीडितावर टॉयलेट सीट चोरल्याचा आरोप करून ही घटना घडली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी स्थानिक भाजप नेते राधेश्याम मिश्रा आणि सरोज आणि राकेश तिवारी नावाच्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Back to top button
error: Content is protected !!