राष्ट्रीय
Trending

धर्मांतरासाठी तरुणाने प्रेयसीला चौथ्या मजल्यावरून ढकलले ! आरोपीने युवतीला मोबाईल दिल्याने बिंग फुटून दोन कुटुंबात हाणामारी !!

कुटुंबीयाच्या आरोपाने उडाली खळबळ !

Story Highlights
  • मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि उत्तर प्रदेश धर्म परिवर्तन प्रतिबंध कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे.
  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुफियानने मुलीला मोबाईल फोन दिला होता आणि मुलीच्या घरच्यांना याची माहिती मिळताच ते सुफियानच्या घरी पोहोचले, तिथे दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी झाली.

लखनौ, 16 नोव्हेंबर – राजधानीत धर्मांतराच्या कथित प्रयत्नावरून झालेल्या भांडणात एका व्यक्तीने आपल्या 19 वर्षीय मैत्रिणीला चौथ्या मजल्यावरून ढकलून दिले. एका पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली.

त्यांनी मृताच्या नातेवाईकांच्या हवाल्याने सांगितले की, मुलीचा प्रियकर धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होता. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेपासून आरोपी फरार असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली आहेत.

सह पोलिस आयुक्त पीयूष मोरडिया यांनी पत्रकारांना सांगितले की, “दुबग्गा पोलिस स्टेशन परिसरात मंगळवारी रात्री ही घटना घडली. मुलगी तिच्या कुटुंबासह आरोपी तरुण सुफियानच्या घरी गेली होती आणि कुटुंबातील दोन्ही सदस्य आपापसात बोलत असताना आरोपीने मुलीला इमारतीच्या चौथ्या मजल्यावर नेले आणि तिथून तिला ढकलून दिले.

सह पोलिस आयुक्त पीयूष मोरडिया म्हणाले, “मुलगी आणि आरोपी हे शेजारी होते आणि दोघांचे कुटुंबीय त्यांच्या नात्याला विरोध करत होते.”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुफियानने मुलीला मोबाईल फोन दिला होता आणि मुलीच्या घरच्यांना याची माहिती मिळताच ते सुफियानच्या घरी पोहोचले, तिथे दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी झाली.

मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि उत्तर प्रदेश धर्म परिवर्तन प्रतिबंध कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

सह पोलिस आयुक्त पीयूष मोरडिया म्हणाले, “मृत मुलीच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की आरोपी तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणत होता. आमचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपी तरुणाच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

Back to top button
error: Content is protected !!