राष्ट्रीय
Trending

माता-पित्याने सुपारी देऊन दारुड्या मुलाची केली हत्या ! पार्टीत दारू पाजून सुपारीबाज टोळीने गळा दाबून केला खून !!

Story Highlights
  • मुलाला असलेले दारूचे व्यसन आणि त्याच्या छळाला कंटाळून माता-पित्याने त्याच्या हत्येचा कट रचला.

हैदराबाद, 2 नोव्हेंबर – आपल्या मुलाच्या दारूच्या व्यसनामुळे आणि छळामुळे त्रासलेल्या एका वृद्ध जोडप्याने तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात सुपारी देऊन मारेकऱ्यांकरवी त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाला असलेले दारूचे व्यसन आणि त्याच्या छळाला कंटाळून माता-पित्याने त्याच्या हत्येचा कट रचला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 ऑक्टोबर रोजी, 26 वर्षीय तरुणाला त्याच्या काकांनी शेजारच्या नलगोंडा जिल्ह्यात एका दारूच्या पार्टीत नेले, जिथे त्याला दारू दिली गेली आणि नंतर सुपारीबाज टोळीने त्याचा गळा दाबून खून केला.

पोलिसांनी सांगितले की, यानंतर तरुणाचा मृतदेह सूर्यपेट जिल्ह्यातील मुशी नदीत फेकून दिला होता, जो दुसऱ्या दिवशी सापडला. पोलिसांनी सांगितले की, तरुणाचे माता पिता 10 दिवसांनीच मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पोहोचले.

मात्र, माता पित्याने आपला मुलगा बेपत्ता झाल्याची पोलिसांत तक्रार का केली नाही, याबाबत तपास सुरू झाला. या प्रकरणाच्या तपासादरम्यान एका वाहनातून महत्त्वाची माहिती मिळाली.

चौकशी केल्यानंतर तरुणाच्या माता-पित्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 ऑक्टोबर रोजी काकांसह त्यांना अटक करण्यात आली.

Back to top button
error: Content is protected !!