राष्ट्रीय
Trending

‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सहा जणांना अटक !

परवानगीशिवाय मिरवणूक आणि आक्षेपार्ह घोषणा दिल्याबद्दल एफआयआर

Story Highlights
  • परवानगीशिवाय मिरवणूक काढल्याबद्दल आणि आक्षेपार्ह घोषणा दिल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

आझमगड (उत्तर), ७ नोव्हेंबर – बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही अटक करण्यात आली.

गेल्या आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जहांगंजमध्ये बसपा कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर काही लोक ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

मोहम्मद अफजल, खुर्शीद अहमद, पप्पू खान, मकसूद आलम, अब्दुल वसीद आणि झुबेर अहमद या सहा जणांना शनिवारी अटक करण्यात आली असून त्यांची नावे तपासादरम्यान समोर आल्याने पोलिसांनी सांगितले.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक (शहर) शैलेंद्र लाल यांनी सांगितले की, परवानगीशिवाय मिरवणूक काढल्याबद्दल आणि आक्षेपार्ह घोषणा दिल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

ते म्हणाले की, पोलीस व्हायरल व्हिडिओचे फुटेज तपासत असून याप्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

Back to top button
error: Content is protected !!