महाराष्ट्रराष्ट्रीय
Trending

शरद पवार महाराष्ट्रात ‘भारत जोडो यात्रे’चे करू शकतात स्वागत !

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’चे महाराष्ट्रात प्रवेश करताना स्वागत करू शकतात.

काँग्रेसशी संबंधित विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

ही यात्रा ९ नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होणार आहे.

सूत्रांनी सांगितले की, “शरद पवार आणि त्यांच्या खासदार कन्या सुप्रिया सुळे यांनी या महाराष्ट्र भेटीचे स्वागत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांच्या या भेटीचे स्वागत होण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी आणि कार्यकर्त्यांनी 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून ‘भारत जोडो यात्रा’ सुरू केली होती. सध्या ही यात्रा कर्नाटकात आहे. या यात्रेचा समारोप पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला काश्मीरमध्ये होईल. या प्रवासात एकूण 3570 किलोमीटरचे अंतर कापले जाणार आहे.

काश्मीरमध्ये पदयात्रेला जाणार्‍या राहुलसह 119 नेत्यांना पक्षाने “भारत यात्री” असे नाव दिले आहे. ही यात्रा त्यासाठी संजीवनी ठरेल, असा विश्वास काँग्रेसला वाटतो.

यात्रा सुरू होण्यापूर्वी काँग्रेसने सर्व समविचारी राजकीय पक्ष आणि संघटनांना यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

यात्रेच्या प्रारंभी तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुक नेते एमके स्टॅलिन कन्याकुमारी येथे उपस्थित होते. इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) आणि रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी (RSP) चे नेते केरळमधील यात्रेत सहभागी झाले होते.

कर्नाटकातील या यात्रेत जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे काही नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाल्याचे काँग्रेस सूत्रांचे म्हणणे आहे.

Back to top button
error: Content is protected !!