राष्ट्रीय
Trending

समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे निधन !

लखनौ, 10 ऑक्टोबर – समाजवादी पक्षाचे (एसपी) संस्थापक आणि माजी संरक्षण मंत्री मुलायम सिंह यादव यांचे सोमवारी निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.

सपा अध्यक्ष आणि मुलायम यांचे पुत्र अखिलेश यादव यांनी ट्विट करून ही माहिती दिली. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

माझे आदरणीय वडील आणि सर्वांचे नेते राहिले नाहीत, असे अखिलेश यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

मुलायमसिंग यादव यांना ऑगस्टपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यांना 2 ऑक्टोबर रोजी आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते आणि तेव्हापासून ते जीवनरक्षक प्रणाली/औषधांवर होते.

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या निधनाने समाजवादी पक्षात शोककळा पसरली आहे.

Back to top button
error: Content is protected !!