पुण्यात पीएफआयच्या निदर्शनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणेचा कथित व्हिडियो, अशा घोषणा राज्यात खपवून घेणार नाही – मुख्यमंत्री शिंदे
पुणे (महाराष्ट्र), २४ सप्टेंबर – येथील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने (पीएफआय) आयोजित केलेल्या निषेधादरम्यान आंदोलकांनी “पाकिस्तान जिंदाबाद”च्या घोषणा दिल्याचा कथित व्हिडिओ समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्या जाईल यात जर कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अशा घोषणा राज्यात खपवून घेतल्या जाणार नाहीत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घोषणाबाजीत सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही.
पकडण्यात आलेल्या पीएफआय कार्यकर्त्यांना पोलिसांच्या वाहनातून नेत असताना अनेक वेळा घोषणाबाजी करण्यात आल्याचे कथित व्हिडिओमध्ये दिसत आहे.
या घटनेनंतर महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) काही नेत्यांनी अशा घोषणा देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
याचा तपास सुरू असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले.
पीएफआयच्या कार्यालयांवर देशव्यापी छापे टाकल्याच्या निषेधार्थ संघटनेच्या वतीने शुक्रवारी पुणे शहरातील जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.
यावेळी सुमारे 40 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी आंदोलकांनी “पाकिस्तान झिंदाबाद” च्या घोषणा दिल्याचा कथित व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेबाबत पोलिसांना विचारणा केली असता त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले.
पोलिस उपायुक्त सागर पाटील म्हणाले, “आम्ही पीएफआय सदस्यांविरुद्ध बेकायदेशीरपणे कामगिरी केल्याबद्दल आधीच गुन्हा दाखल केला आहे आणि आम्ही कथित व्हिडियोतील घोषणाबाजी प्रकरणाची चौकशी करत आहोत.”
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the भास्करविश्व मीडिया channel on WhatsApp👇
https://whatsapp.com/channel/0029Va8zRcn3bbVBA3JmZk26 - 9923355999 हा मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट