औरंगाबाद, दि. 06 -: खरीप पणन हंगाम 2022-23 मधील किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत भरडधान्य खरेदी करण्याकरीता जिल्ह्यात 10 खरेदी केंद्रावर गंगापूर, लासुर, खुलताबाद, वैजापूर, कन्नड, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, करमाड व पाचोड येथे हमीभावाने भरडधान्य नोंदणीकरीता दि.24 सप्टेंबर ते 15 ऑक्टेाबर पर्यंत सुरु करण्यात आलेली आहे.
शासनाने भरडधान्य खरेदी करीता किमान आधारभुत खरेदी दर व नोंदणी कालावधी पुढीलप्रमाणे निश्चित केला आहे. ज्वारी हायब्रीड हमीभाव नुसार दर रू.2970/-, ज्वारी मालदांडी हमीभाव नुसार दर रू. 2990/-, बाजरा हमीभाव नुसार दर रू.2350/-,
मका हमीभाव नुसार दर रू.1962/- सदर पिकाची नोंदणी दि.24 सप्टेंबर 22 ते 15 ऑक्टोबर 22 तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी एस.के.पांडव यांनी केले आहे.
- गुगल अॅप इंन्स्टॉल करा अन् राहा अपडेट👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.sambhajinagarlive.news - WhatsApp ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/D1vs2HoW4eqFRkoSoO98Om - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063797745685&mibextid=ZbWKwL - Telegram channel 👇
https://t.me/+YKOHk5GZrKVW8VPP - Follow the भास्करविश्व मीडिया channel on WhatsApp👇
https://whatsapp.com/channel/0029Va8zRcn3bbVBA3JmZk26 - 9923355999 हा मोबाईल नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करा अन् मिळवा अपडेट