राष्ट्रीय
Trending

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त नवजात बालकांना सोन्याच्या अंगठ्या देण्याची योजना !

भाजपच्या तामिळनाडू युनिटचा अभिनव उपक्रम

चेन्नई, 16 सप्टेंबर – भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तामिळनाडू युनिटने शनिवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नवजात बालकांना सोन्याच्या अंगठ्या आणि ‘बेबी किट्स’ भेट देण्यासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे नियोजन केले आहे.

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 सप्टेंबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या मुलांना सोन्याच्या अंगठ्या देण्यात येणार आहेत. प्रत्येक अंगठीचे वजन सुमारे दोन ग्रॅम असेल.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री एल मुरुगन रोयापुरम येथील RSRM हॉस्पिटलमध्ये लाभार्थ्यांना सोन्याच्या अंगठीसह ‘बेबी किट’ भेट देतील.

तसेच, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त ते कोलाथूर विधानसभा मतदारसंघातील लोकांना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत 750 किलो मासळीचे वाटप करणार आहेत.

या विधानसभा जागेचे प्रतिनिधित्व मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन करतात.

Back to top button
error: Content is protected !!