राष्ट्रीय
Trending

मूल होत नाही म्हणून सूनेला टोमणा, संतापलेल्या मुलाने केली वडिलांची फावड्याने हत्या !

धमतरी, 21 सप्टेंबर- मूल होत नाही म्हणून सूनेला टोमणा मारल्याने संतापलेल्या मुलाने वडिलांची फावड्याने हत्या केली. ही खळबळजनक घटना छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात घडली. पोलिस अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील नागरी भागातील देवपूर गावात राहणारा शिवनारायण सतनामी (५५) याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याचा मुलगा खेलदास (३०) याला अटक केली आहे.

त्यांनी सांगितले की, सुमारे 12 वर्षांपूर्वी खेलनदासचे संगीतासोबत लग्न झाले होते आणि मूल नसताना शिवनारायण संगीताला नेहमी टोमणे मारत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे संगीता आणि खेलदास यांना त्रास होत असे.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंगळवारी शिवनारायण आणि संगीता यांच्यात वाद झाला, त्यावेळी शिवनारायणने संगीताला मूल होत नाही म्हणून टोमणा मारला.

यामुळे संतापलेल्या खेलदासने वडिलांवर फावड्याने वार केले. या घटनेत शिवनारायण गंभीर जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर स्थानिक लोकांनी शिवनारायण यांना उपचारासाठी नागरी गावात नेले, तेथून त्यांना धमतरी येथे पाठवण्यात आले. शिवनारायण यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता बुधवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, वडिलांच्या हत्येप्रकरणी खेलदासला अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Back to top button
error: Content is protected !!