महाराष्ट्रराष्ट्रीय
Trending

माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले ! देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितले !!

Story Highlights
  • फडणवीस आणि भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील अंतर्गत कलहामुळे बंडखोरी झाली आणि भाजपचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असे सांगितले आहे.

मुंबई, 31 ऑक्टोबर – आज देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितले, की माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले. मी त्यांना सांगितले होते की, आम्हाला सरकार बनवायचे आहे. तुम्ही सोबत हवे आहात.आमची इच्छा आहे की तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये यावे… महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीरपणे हा गौप्यस्फोट केला.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर 29 जून रोजी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पडले. दुसऱ्या दिवशी शिंदे यांनी मुख्यमंत्री तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

फडणवीस आणि भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील अंतर्गत कलहामुळे बंडखोरी झाली आणि भाजपचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असे सांगितले आहे.

कडू आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील लाचखोरीच्या आरोपाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “”अपक्ष आमदार बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत माझ्या फोनवर गुवाहाटीला गेले होते. मी त्यांना फोन करून सांगितले होते की नवीन सरकार बनवण्यासाठी आम्हाला तुमचा पाठिंबा आणि सहभाग हवा आहे. म्हणून ते तिथे गेले आणि सामील झाले.”

ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले बच्चू कडू यांनी सुरतमध्ये शिंदे यांची भेट घेतली होती आणि त्यांच्यासोबत गुवाहाटीलाही गेले होते. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात सामील होण्यासाठी पैसे (खोके) घेतल्याचा आरोप राणा यांनी केला होता. दरम्यान, आजच त्यांनी बच्चू कडू यांची माफी मागून दिलगीरी व्यक्त केली.

Back to top button
error: Content is protected !!