राष्ट्रीय
Trending

नर्सरीच्या चार वर्षीय विद्यार्थिनीस पाठीतून रक्त येईपर्यंत बेदम मारहाण, शिक्षिकेवर गुन्हा दाखल !

Story Highlights
  • कुटुंबीयांनी असाही दावा केला आहे की जेव्हा ती घरी परतली तेव्हा तिला खूप ताप आला होता आणि तिच्या पाठीतून रक्त येत होते आणि तिच्या चेहऱ्यावर थाप मारल्याच्या खुणा होत्या.

मथुरा, 22 ऑक्टोबर (पीटीआय) उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील कोसीकलन शहरातील एका खाजगी शाळेत नर्सरी वर्गातील विद्यार्थिनीसोबत कथित मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

कोसीकलन पोलिस स्टेशनचे निरीक्षक चेतराम शर्मा यांनी सांगितले की, नर्सरी वर्गातील विद्यार्थिनी आणि तिच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की गुरुवारी शिक्षिका सविताने मुलीला बेदम मारहाण केली.

मुलीच्या कुटुंबीयांनी असाही दावा केला आहे की जेव्हा ती घरी परतली तेव्हा तिला खूप ताप आला होता आणि तिच्या पाठीतून रक्त येत होते आणि तिच्या चेहऱ्यावर थाप मारल्याच्या खुणा होत्या.

याबाबत शुक्रवारी पालक शाळेत तक्रार करण्यासाठी गेले असता शिक्षकाने माफी मागण्याऐवजी त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर पालकांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

शर्मा यांनी सांगितले की, मुलीचे मेडिकल करण्यात आले असून तिच्या पालकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!