राष्ट्रीय
Trending

तिकीट न मिळाल्याने संतापलेला ‘आप’चा माजी नगरसेवक विजेच्या टॉवरवर चढला !

Story Highlights
  • अडीचशे वॉर्ड असलेल्या एमसीडीसाठी ४ डिसेंबरला मतदान होणार असून ७ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर – आम आदमी पक्षाचे (आप) माजी नगरसेवक हसीब-उल-हसन यांना आगामी दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) निवडणुकीसाठी तिकीट नाकारण्यात आल्याने रागाच्या भरात तो रविवारी पूर्व दिल्लीतील विजेच्या टॉवरवर चढला.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना सकाळी 10.51 वाजता गांधी नगर भागात एक व्यक्ती इलेक्ट्रिक टॉवरवर चढल्याची माहिती मिळाली.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पोलीस कर्मचारी, अग्निशमन दल आणि बीएसईएसचे अधिकारी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचले आणि हसनला खाली उतरण्याची विनंती केली आणि त्याने शेवटी होकार दिला.

‘आप’ने शुक्रवारी उमेदवारांची पहिली आणि दुसऱ्या दिवशी 117 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.

अडीचशे वॉर्ड असलेल्या एमसीडीसाठी ४ डिसेंबरला मतदान होणार असून ७ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

Back to top button
error: Content is protected !!