राष्ट्रीय
Trending

884 अंगणवाडी सेविकांना बडतर्फीच्या नोटिसा ! अंगणवाडी सेविकांच्या दोन दिवसीय उपोषणाने राजधानी हादरली !!

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर – 39 दिवसांच्या संपात सहभागी झाल्याबद्दल सरकारने 884 अंगणवाडी सेविकांना बडतर्फ केल्याने संपूर्ण महिला वर्गांत संतापाची लाट पसरली आहे. याविरोधात अंगणवाडी सेविकांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. दरम्यान, प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. सरकारने बडतर्फीची केलेली तडकाफडकी कारवाई आणि हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर उतरल्याने राजधानी हादरली आहे.

दिल्ली राज्य अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस युनियन (DSAWHU) च्या सदस्यांनी सोमवारी महिला आणि बाल विकास विभागाच्या कार्यालयाबाहेर दोन दिवसीय उपोषण सुरू केले. बडतर्फीच्या विरोधात हे उपोषण पुकारले आहे.

युनियनच्या म्हणण्यानुसार, डिसमिस चुकीची आहे हे विभागाने दिल्ली उच्च न्यायालयात मान्य करावे अशी त्यांची मागणी आहे.

युनियनच्या एका सदस्यांनी सांगितले की, “आमच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान महिला आणि बालविकास विभागाने हे मान्य केले होते की, डिसमिस करणे चुकीचे आहे. हे चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचे विभागाने न्यायालयात कबूल करावे, अशी आमची मागणी आहे.

हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

युनियनने सांगितले की, 39 दिवसांच्या संपात सहभागी झाल्याबद्दल दिल्ली सरकारने 884 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बडतर्फीच्या नोटिसा दिल्या आहेत आणि 11,942 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Back to top button
error: Content is protected !!