राष्ट्रीय
Trending

शहरातील अतिक्रमणां संदर्भात पोलीस कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीबाबत परिपत्रक जारी !

Story Highlights
  • बेकायदा बांधकाम थांबवणे, कामगारांना जागेवरून हटवणे आणि बांधकाम साहित्य जप्त करणे यासाठी पालिका अधिकाऱ्याकडून दिल्ली महानगरपालिका कायद्याच्या कलम 344(2) अंतर्गत माहिती दिल्यानंतरच पोलिस पुढील हस्तक्षेप करू शकतात.

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर – दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांनी शहरातील अतिक्रमणांच्या संदर्भात पोलीस कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीबाबत परिपत्रक जारी केले आहे.

पोलिसांविरुद्ध गैरवर्तनाच्या तक्रारी आल्यानंतर हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

शनिवारी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, दिल्ली पोलिसांच्या स्थायी आदेशान्वये बेकायदेशीर खाजगी बांधकामांबाबत संबंधित महानगरपालिका अधिकार्‍यांना योग्यरित्या माहिती देणे ही दिल्ली महानगरपालिका कायद्याच्या कलम 475 अंतर्गत दिल्ली पोलिसांची भूमिका आहे.

बेकायदा बांधकाम थांबवणे, कामगारांना जागेवरून हटवणे आणि बांधकाम साहित्य जप्त करणे यासाठी पालिका अधिकाऱ्याकडून दिल्ली महानगरपालिका कायद्याच्या कलम 344(2) अंतर्गत माहिती दिल्यानंतरच पोलिस पुढील हस्तक्षेप करू शकतात.

या परिपत्रकात म्हटले आहे की, सरकारी जमिनीवर अतिक्रमण किंवा त्यांच्यासमोर कोणतेही अतिक्रमण झाल्याची माहिती मिळाल्यावर पोलिस स्वतः हस्तक्षेप करू शकतात.

परिपत्रकात पुढे म्हटले आहे की अनेक वेळा सर्व जिल्ह्यांमधून पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्या गैरप्रकारांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

लोकांचा कायद्यावरील विश्वास हेच आमच्या यशाचे गमक असून याबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही, असे परिपत्रकात म्हटले आहे. बाजारपेठ, निवासी वसाहती आणि इतर ठिकाणच्या पोलिसांनी आपली जबाबदारी स्पष्टपणे ओळखली पाहिजे आणि यामध्ये कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही.

Back to top button
error: Content is protected !!