राष्ट्रीय
Trending

कोविडची लस न घेणाऱ्या शिक्षकाला ड्युटी करू देण्याचे आदेश ! उच्च न्यायालयाचा शाळेला “बुस्टर डोस” !!

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर – दिल्ली उच्च न्यायालयाने कोविड-19 ची लस न घेतलेल्या शिक्षकाला कर्तव्यावर रुजू होण्याचे निर्देश येथील एका खाजगी शाळेला दिले आहेत. शिक्षकाला कोविड लसीची ‘अॅलर्जी’ असण्याचा धोका असल्याचे वैद्यकीय मंडळाला आढळून आले होते.

न्यायमूर्ती रेखा पल्ली यांनी त्यांच्या आदेशात शिक्षकांना शाळेच्या आवारात नेहमी मास्क घालण्यास आणि योग्य कोविड वर्तन आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले.

दिल्ली सरकारने न्यायालयाला सांगितले की, याचिकाकर्त्याची वैद्यकीय स्थिती पाहता, त्यांनी विशेष बाब म्हणून कोविड लसीकरणातून सूट देण्याची शिक्षकाची विनंती मान्य केली आहे.

न्यायालयाने 22 सप्टेंबर रोजी हा आदेश दिला. न्यायालयाने शाळेला निर्देश दिले की,  10 टक्के कपात केल्यानंतर उर्वरित वेतन, संबंधित कालावधीसाठी देय असलेले इतर भत्ते याचिकाकर्त्याला जारी करावेत.

एम्सने स्थापन केलेल्या पाच सदस्यीय मंडळाच्या अहवालानुसार, याचिकाकर्त्याला “सर्वसामान्य लोकांपेक्षा कोविड-19 लसीची ऍलर्जी होण्याचा धोका जास्त आहे”. याचिकाकर्त्याला एका प्रकारच्या कर्करोगाने ग्रासले आहे आणि डॉक्टरांनी सांगितले की, जर त्याने कोविडची लस घेतली तर त्याची प्रकृती आणखी बिघडू शकते.

Back to top button
error: Content is protected !!