राष्ट्रीय
Trending

औरंगाबादेतील (बिहार) शाहगंजमध्ये गॅस गळतीमुळे घराला भीषण आग, 25 जण होरपळले !

Story Highlights
  • शाहगंज परिसरातील वॉर्ड क्रमांक 24 मध्ये राहणारे अनिल गोस्वामी यांच्या घरात ही दुर्घटना गडली.

औरंगाबाद, २९ ऑक्टोबर – बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी सकाळी छठ सण/पुजेसाठी प्रसाद बनवताना घरातील स्वयंपाकाच्या गॅसच्या पाईपमधून गळती होऊन सिलिंडर स्फोटाच्या आगीत 25 जण होरपळले. या जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

शहर पोलिस उपनिरीक्षक विनय कुमार सिंह यांनी सांगितले की, शाहगंज परिसरातील वॉर्ड क्रमांक 24 मध्ये राहणारे अनिल गोस्वामी यांच्या घरात ही दुर्घटना गडली.

सिंह म्हणाले की आगीत जळालेल्या लोकांमध्ये गोस्वामी आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य, पाच पोलिस कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि आग विझवण्यासाठी तेथे पोहोचलेले शेजारी यांचा समावेश आहे.

सिंह यांच्या म्हणण्यानुसार, जळालेल्या लोकांना सदर रुग्णालयात नेण्यात आले, तेथून डॉक्टरांनी काही गंभीर जखमींना इतर रुग्णालयात पाठवले.

उपनिरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अग्निशमन दल आणि स्थानिक लोकांच्या मदतीने घरातील आग आटोक्यात आणण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!