राष्ट्रीय
Trending

महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल ! रस्त्यावरील खड्ड्यात एकाचा बळी !!

फरीदाबाद (हरियाणा), ६ ऑक्टोबर – रस्ता बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे फरीदाबाद महानगरपालिकेचे दोन अधिकारी आणि एका कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली.

बबलू (३४) असे मृताचे नाव असून तो बिहारमधील भागलपूरचा रहिवासी असून तो फरीदाबादमधील शिव कॉलनीत राहत होता.

पोलिसांनी सांगितले की, बबलूच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार केली होती की, 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी ते घराकडे जात असताना बबलू घाणेरड्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडला आणि बुडाला. ही घटना सेहतपूर गावातील असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांनी सांगितले की, महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केली आणि आजूबाजूच्या लोकांनी बबलूला खड्ड्यातून बाहेर काढले. रुग्णालयात आणल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.

Back to top button
error: Content is protected !!