अर्थराष्ट्रीय
Trending

आयडीबीआय बँकेतील 60.72 टक्के हिस्सा विक्रीला काढला, सरकारने बोली आमंत्रित केल्या !

नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर – सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय बँकेतील एकूण 60.72 टक्के हिस्सा विकून बँकेचे खाजगीकरण करण्यासाठी संभाव्य गुंतवणूकदारांकडून बोली (निविदा) मागवल्या आहेत.

निवीदा जमा करणे, अभिरुची पत्र (EOI) सादर करण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर 2022 निश्चित करण्यात आली आहे.

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) कडे सध्या IDBI बँकेत 529.41 कोटी शेअर्ससह 49.24 टक्के शेअर्स आहेत तर केंद्र सरकारकडे 488.99 कोटी शेअर्ससह 45.48 टक्के शेअर्स आहेत.

गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने (DIPAM) शुक्रवारी निविदा मागवत नमूद केले की, या प्रक्रियेत सरकारचा 30.48 टक्के आणि एलआयसीचा 30.24 टक्के हिस्सा विकला जाईल.

आयडीबीआय बँकेच्या समभाग भांडवलाच्या ६०.७२ टक्के भागभांडवल या दोघांची मिळून आहे. त्याच बरोबर, आयडीबीआय बँकेतील कंट्रोलिंग स्टेक देखील संभाव्य खरेदीदाराकडे हस्तांतरित केला जाईल.

आयडीबीआय बँकेचे शेअर्स बीएसई सेन्सेक्सवर मागील बंदच्या तुलनेत 0.71 टक्क्यांनी वाढून 42.70 रुपयांवर बंद झाले. सध्याच्या बाजारभावानुसार, या बँकेतील 60.72 टक्के भागभांडवल 27,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

Back to top button
error: Content is protected !!