राष्ट्रीय
Trending

भाजपा खासदार मोहन कुंडारिया यांच्या 12 नातेवाईकांचा मोरबी पूल दुर्घटनेत मृत्यू !

Story Highlights
  • रविवारी संध्याकाळी मोरबीमध्ये मच्छू नदीवर पूल कोसळून किमान 134 जणांचा मृत्यू झाला.

मोरबी, 31 ऑक्टोबर – मोरबी शहरातील पूल कोसळून 12 नातेवाईकांचा मृत्यू झाला, अशी माहिती गुजरातचे राजकोट लोकसभा सदस्य मोहन कुंडारिया यांनी सोमवारी दिली.

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार कुंदारिया यांनी सांगितले की, रविवारी ही घटना घडली तेव्हा ते पिकनिकला गेले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी मोरबीमध्ये मच्छू नदीवर पूल कोसळून किमान 134 जणांचा मृत्यू झाला.

कुंडारिया यांनी सांगितले की, ज्या नातेवाईकांचा मृत्यू झाला त्यात पाच मुले, चार महिला आणि तीन पुरुष आहेत. सर्व त्यांच्या मोठ्या भावाचे जवळचे नातेवाईक आहेत.

या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

“माझ्या मोठ्या भावाच्या मेहुण्याच्या चार मुली, यांच्यातील तीन पती आणि पाच मुले दुर्घटनेत ठार झाले,” असे कुंडारिया म्हणाले.

ते टंकारा तालुक्यातील वेगवेगळ्या गावचे असून बसने मोरबीला गेले होते, असे त्यांनी सांगितले.

खासदार कुंडारिया म्हणाले, “रविवार असल्याने घटना घडली तेव्हा ते पिकनिकला गेले होते. घटनेच्या अर्ध्या तासानंतर मी येथे पोहोचलो आणि कालपासून बचाव कार्यात मदत करत आहे.”

ते म्हणाले, “अनेक लोक मरण पावले आहेत. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर आम्ही कठोर कारवाई करू.”

कुंडारिया म्हणाले की, पूल कोसळण्याच्या घटनेनंतर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल मोरबीमध्येच तळ ठोकून आहेत.

ते म्हणाले, “आम्ही हे सुनिश्चित करू की एवढ्या लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार कोणीही सुटणार नाही.”

Back to top button
error: Content is protected !!