राष्ट्रीय
Trending

रेराचे पालन न केल्याबद्दल 13 बिल्डरांना 1.39 कोटींचा दंड ! बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले !!

बिल्डरांना आतापर्यंत सुमारे 50 कोटी रुपयांचा दंड ठोठावला

नोएडा (यूपी), 25 सप्टेंबर – उत्तर प्रदेश रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (UP RERA) ने 13 बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या अनेक आदेशांचे पालन न केल्याबद्दल एकूण 1.39 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

यासोबतच रेराने बांधकाम व्यावसायिकांना दंडाची रक्कम १५ दिवसांत जमा करण्याचे आदेश दिले असून तसे न केल्यास कायदेशीररित्या रक्कम वसूल करण्याचा इशारा दिला आहे.

‘यूपी रेरा’च्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, ४५ हजारांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यापैकी सुमारे ४० हजार तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे, परंतु बांधकाम व्यावसायिक अनेक आदेशांचे पालन करत नव्हते.

त्यांनी सांगितले, UP RERA च्या आढावा बैठकीत 13 बांधकाम व्यावसायिकांना दिलेल्या शेकडो आदेशांचे अनेक वेळा नोटिसा देऊनही पालन करण्यात आलेले नाही.

यूपी रेरा अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, सर्व बांधकाम व्यावसायिक NCR (उत्तर प्रदेशमधील राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) मधील आहेत. ते म्हणाले की, रेराने आतापर्यंत सुमारे 50 कोटी रुपयांचा दंड बिल्डरांना ठोठावला आहे.

Back to top button
error: Content is protected !!