महाराष्ट्र
Trending

वाळूज: गरवारे कंपनी समोरील खूनाचा गुन्हा 24 तासांत उघड, परभणीचा आरोपी गुन्हे शाखेकडून जेरबंद !

Story Highlights
  • गरवारे कंपनीसमोर मोकळ्या मैदानात एका क्रुझरमध्ये मिळून आलेल्या मृताच्या मारेकऱ्याचा शोध.

औरंगाबाद, दि. 16 – वाळूज परिसरातील गरवारे कंपनीसमोरील मोकळ्या जागेतील खून प्रकरणाचा उलगडा गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासांत केला. वाळूज परिसरात राहत असलेला परंतू मुळचा परभणी जिल्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली.

गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांनी दिलेली माहिती अशी की, गरवारे कंपनीसमोर मोकळ्या मैदानात एका क्रुझरमध्ये मिळून आलेल्या मृताच्या मारेकऱ्याचा शोध घेत असताना दि.16/11/2022 रोजी गुन्हे शाखेला माहीती मिळाली की, ही खून शेख तौफिक (साठेनगर, वाळुज, औरंगाबाद) याने केल्याची माहीती मिळाली.

त्यावरून सदर आरोपीचा शोध घेत असताना 8 वाजता शेख तौफिक शेख रफिक (वय 22 वर्षे, धंदा- मॅकेनिक, रा. ह. मु. इसाब भाई यांच्या घरात भाडयाने, साठेनगर, वाळूज, ता. गंगापूर जि. औरंगाबाद मुळ पत्ता रोहिला पिंपरी, ता. जिंतुर जि. परभणी) यास ताब्यात घेतले.

त्यास गुन्ह्यासंबंधाने विचारपूस केली असता त्याने सदरचा खून केल्याची कबुली दिली. त्यास ताब्यात घेवून पुढील तपासकामी पो.स्टे. एम. वाळुज येथे हजर केले. पो.ठाणे वाळूज, औरंगाबाद शहर गुरनं 345/2022 कलम 302, 201 भादवि प्रमाणेचा खुनाचा गुन्हा चोवीस तासांच्या आत उघडकीस आणला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-1) उज्जला वनकर, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) अपर्णा गिते, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे विशाल ढुमे, पोलीस निरीक्षक, अविनाश आघाव, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मनोज शिंदे, पोउपनि अजित दगडखैर, पोउपनि गजानन सोनटक्के, पोउपनि रमाकांत पटारे, सफौ विठ्ठल जवखेडे, पोअं रविंद्र खरात, पोअं सुनील बेलकर, पोअं संदीप बीडकर, पोअं विजय भानुसे, पोअं विलास मुठे, पोअं अजय दहिवाल, पोअं धनंजय सानप, पोअं नितीन देशमुख, पोअं धर्मराज गायकवाड, पोअं संदीप पाटील यांनी केली.

तसेच पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, पो.स्टे. एम. वाळुज, पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, पो.स्टे. वाळुज व त्यांचे सहकारी यांनीही सांघिक कामगिरी बजावली.

Back to top button
error: Content is protected !!