महाराष्ट्र
Trending

पैठण एमआयडीसी पोलिसांची श्रीराम कॉलनी मुधलवाडीत छापेमारी, नवगावच्या दोघांना गुटख्यासह पकडले ! दोन लाख 36 हजारांचा माल जप्त !

औरंगाबाद, दि. २८ – गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून पैठण एमआयडीसी पोलिसांनी श्रीराम कॉलनी मुधलवाडीत छापा टाकून गुटख्याचा पिकअप व्हॅन जप्त केला. ३६ हजारांच्या गुटख्यासह एकूण 2,36,809 रुपयांचा माल पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतला.

गणेश उत्तमराव पाचे (वय २६ वर्षे रा. नवगाव) व फिरोज नबाब शेख (२९ वर्षे, नवगाव, ता. पैठण) व प्रशांत गणेश ढोले (रा. बालानगर ह.मु. श्रीराम कॉलनी मुधलवाडी एमआयडीसी) अशी आरोपींची नावे असून त्यांच्यावर पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोना राहुल सर्जेराव मोहतमल (पो. ठाणे एमआयडीसी पैठण) यांनी दिलेली माहिती अशी की, ते पिंपळवाडी पि. बिटचे कामकाज करतात. पोना राहुल सर्जेराव मोहतमल व सोबत पोशि सोनवणे, घाटेश्वर पिंपळवाडी पि बीट भागात पट्रोलिंग कामी असताना 14.50 वा. गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की दोन जण पिकअप लोडींग वाहनात प्रतिबंधीत पदार्थ गुटखा पानमसाला विनापरवाना बेकायदेशिररित्या बंदी असलेला विक्री करणेसाठी श्रीराम कॉलनी मुधलवाडी एमआयडीसी येथून घेवून जात आहे.

ही खात्रीशिर बातमी असल्याने पंचनाम्यातील दोन पंच सोबत घेवून छाप्याचे नियोजन करण्यात आले. पोलीस पथक व पंच मिळालेल्या गुप्त माहिती प्रमाणे श्रीराम कॉलनी मुधलवाडी एमाआयडीसी (ता. पैठण) येथे 15.000 वा जावून छापा मारला. सदर ठिकाणी दोन जण पिकअप व्हॅन (एमएच/ 20/ईजी / 9207 )सह मिळुन आले.

त्यांनी त्यांचे नांव  गणेश उत्तमराव पाचे (वय २६ वर्षे रा. नवगाव) व फिरोज नबाब शेख (२९ वर्षे दोन्ही नवगाव ता. पैठण) असे सांगीतले. त्यांच्या वाहनाची पंचासमक्ष झाडती घेतली असता पांढ-या व विटकरी रंगाच्या गोण्यामध्ये गुटखा पान मसाला सुगंधी तंबाखु पुड़े मिळून आले.  त्यांनी हा माल प्रशांत गणेश ढोले (रा. बालानगर ह.मु. श्रीरामकॉलनी मुधलवाडी एमआयडीसी) याने दिल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. 2,36,809 रुपयांचा माल पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतला. यात ३६८०९ रुपयांचा गुटखा आहे.

Back to top button
error: Content is protected !!