महाराष्ट्र
Trending

काँग्रेस नेते नसीम खान रस्ता अपघातात जखमी, भारत जोडो यात्रेला उपस्थित राहण्यासाठी नांदेडला जात असताना अपघात !

Story Highlights
  • नांदेडमधील भिलोई टोल प्लाझा येथे खान प्रवास करत असलेल्या एसयूव्हीला भरधाव वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाला.

मुंबई, 6 नोव्हेंबर – काँग्रेस नेते नसीम खान हे एका रस्ता अपघातात जखमी झाले आहेत. अपघाताच्या वेळी ते हैदराबादहून महाराष्ट्रातील नांदेडला जात होते. सूत्रांनी ही माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे माजी मंत्री खान राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’ला उपस्थित राहण्यासाठी नांदेडला जात होते. राहुल यांची यात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होणार आहे.

पक्षाच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, खान यांच्याकडे नांदेडमधील यात्रेची जबाबदारी आहे. ते म्हणाले की, नांदेडमधील भिलोई टोल प्लाझा येथे खान प्रवास करत असलेल्या एसयूव्हीला भरधाव वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाला.

Back to top button
error: Content is protected !!