राष्ट्रीय
Trending

कार सीट बेल्ट अलार्म ब्लॉकर्सच्या ऑनलाइन विक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश ! अपघातांच्या मालिकांनंतर मंत्रालयाचे कडक पाऊल !!

नवी दिल्ली, 7 सप्टेंबर – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ग्राहक व्यवहार मंत्रालयाला पत्र लिहून ई-कॉमर्स कंपन्यांना सीट बेल्ट अलार्म ब्लॉक करणाऱ्या उपकरणांच्या विक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने या वर्षी मे महिन्यात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला मिळालेल्या तक्रारीच्या आधारे कार सीट बेल्ट अलार्म ब्लॉक करणाऱ्या उपकरणांची विक्री करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांना नोटीस पाठवली होती.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नित गडकरी यांनी मंगळवारी सांगितले की, कारच्या मागील सीटसाठी सीट बेल्ट अलार्म सिस्टम बसवणे अनिवार्य करण्याचा सरकार विचार करत आहे.

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात झालेल्या अपघातात मृत्यू झाल्यानंतर गडकरींचे हे वक्तव्य आले आहे. मिस्त्री गाडीच्या मागच्या सीटवर बसले होते.

Back to top button
error: Content is protected !!